मुंबई – अमेरीकच्या अध्यक्षपदावर डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झाल्यापासून बिटकॉईनच्या दरात एकतर्फी वाढ होत असून ताज्या माहीतीनुसार बिटकॉइनचा दर 82,400 डॉलरवर गेला आहे. प्रचारावेळी ट्रब्म्प यानी आपण बिटकॉईनला चालना देणार असल्याचे सांगितले होते. त्याचे पुत्र एरिक ट्रम्प या क्षेत्रात आहेत.
आपण अमेरीकेला बिट कॉइनची राजधानी करणार असल्याचे त्यानी सांगितले होते. यासाठी आपण मजबुत नियंत्रण व्यवस्था उभारणार असल्याचे त्यानी सांगितले आहे. शियाय बिटकॉईनचेे खंदे समर्थक अॅलोन मस्क ट्रम्प यांचे या क्षेत्रातील सल्लागार म्हणून उदयास आले आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यात बियकॉईनची मगणी वाढली आहे.
तर सोन्यासह इतर वित्तीय उत्पादनाची मागणी कमी होऊ लागली आहे. आता ट्रम्प यांच्याकडे अमेरीकेतील सिनेट आणि लोकप्रतिनिधीगृहात बहुमत आहे. त्यामुळे त्याना याबाबत कायदे बदलण्यास अडथळे येणार नाहीत. क्रिप्टो करन्सी उद्योगाने ट्रम्प यांच्यासह बर्याच निवडून आलेल्या रिनेटर्सना निवडणूक निधी दिलेला आहे.