धक्कादायक ! दहशतवादी कारवायांसाठी होतोय बिटकॉनचा वापर

नवी दिल्ली – आभासी चलानाचा देशांत प्रथमच दहशतवादी कारणांसाठी वापर करण्यात आला. भारतातील दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी इसिसने बिटकॉईनचा वापर केला असल्याचा आरोप एनआयएच्या आरोपत्रात करण्यात आला आहे.

जहानझीब सामी या इसिसच्या हस्तकाने आपल्या ब्रिटनमधील संपर्काच्या आधारे बिटकॉन वॉलेट मिळवले. त्यात निधी जमा करण्याचे आवाहन केले. देशात दहशतवादी हल्ले घडवण्याच्या प्रयत्नात असताना सामी आणि त्याच्या पत्नीला आठ मार्चला अटक करण्यात आली.

या दोघांना मिळालेला बिटकॉन ऍड्रेस हा सिरीयात वास्तव्यास असणाऱ्या ब्रिटिश महिलेचा आहे. लिबिया स्थित इस्लामिक स्टेट्‌सच्या हस्ताकाच्या संपर्कात सामी होता. त्याच्याशी साखळी निर्माण करून निधी गोळा करण्याबाबत चर्चा करत असे. एका दिवसांत 100 ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट सामीने आखला होता.

शस्त्रखरेदी करण्यासाठी क्रेडीट कार्ड चोरण्याचा मार्गही स्वीकारण्याबाबत दोहोंत चर्चा झाली होती. अब्दुला बासित हा तिहार कारागृहात असणारा इसिसचा हस्तक सामी आणि अन्य इसिसच्या कमांडरशी संपर्क साधण्यासाठी सेलफोनचा वापर करत होते, असे या आरोपपत्रात म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.