धोनी क्रिकेटपेक्षा मोठा नाही – बिशन सिंग बेदी

जयपुर – जयपूरच्या मैदानावर राजस्थान आणि चेन्नई दरम्यान झालेल्या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मैदानावर येऊन पंचांशी वाद घातल्याने त्याला सामन्याच्या मानधनाच्या रकमेपैकी 50 % रक्‍कम दंड म्हणुअन भारावी लागणार असली तरी त्याच्यावर टीका देखील केली जात आहे. यावेळी भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदीयांनी धोनी हा क्रिकेटपेक्षामोठा नाही असे म्हणत त्याच्यावर टीका केली आहे.

या घडलेल्या प्रकाराबाबत भारताचे माजी क्रिकेटपटू बिशन सिंग बेदी यांनी धोनीची कानउघाडणी केली आहे. कोणत्याही खेळाडूने अशा पद्धतीची वर्तणूक करणे हे खेळाला लाज आणणारे आहे. त्यामुळे प्रत्येक खेळाडूने हे समजून घेतले पाहिजे की एखादा खेळाडू हा खेळापेक्षा मोठा नसतो, अशा आशयाचे ट्‌विट त्यांनी केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.