Birthday Special | मदर इंडियाच्या सेटवर लागलेल्या आगीमुळे जुळले होते नर्गिस-सुनील दत्त यांचे प्रेमसंबंध

नर्गिस या त्यांच्या अभिनय आणि सौदंर्यासाठी ओळखल्या जातात. आज त्यांचा ९२ वा वाढदिवस. त्यांचे आयुष्य जेवढे ट्रॅजिक तेवढीच त्यांची लव्हस्टोरीही एखाद्या चित्रपटाप्रमाणेच होती.

सुनील दत्त आणि नर्गिस हे दोघेही वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आले होते. नर्गिस मोहन बाबू आणि जद्दनबाई यांच्या कन्या होत्या. तर सुनील दत्त पंजाबी कुटूंबातील होते. सुनील आणि नर्गिस यांनी मदर इंडिया या चित्रपटात एकत्र काम केले. आणि यातील एका घटनेमुळे त्यांचे आयुष्य बदलले.

चित्रपटाने इतिहास रचलाच शिवाय त्यांच्यात प्रेम फ़ुलले. मदर इंडिया चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सेटवर अचानक आग लागली. या आगीमध्ये नर्गिस अडकल्या. चारही बाजूने आग असल्याने त्यांना बाहेर पडत येत नव्हते. मदतीसाठी त्या ओरडत होत्या.

यावेळी सुनील दत्त यांनी एखाद्या हिरोप्रमाणे जीवाची कोणतीही पर्वा न करता आगीत प्रवेश केला. आणि नर्गिस यांचे प्राण वाचविले. यामुळे नर्गिस त्यांच्याकडे प्रभावित झाल्या. परंतु, या आगीत सुनील दत्त यांना खूप जखमा झाल्या होत्या. तेव्हा नर्गिस यांना दिवस-रात्र त्यांची सेवा केली.

यादरम्यान दोघेही मनाने एकमेकांच्या जवळ आले. व आपल्या प्रेमाची कबुली दिली.
सुनील दत्त आणि नर्गिस यांनी ११ मार्च १९५८ रोजी गुप्तपणे विवाह केला. यानंतर बॉलिवूडमधील काही जवळच्या मित्रांना रिसेप्शन दिले.

यानंतर वक्त, खानदान, मुझे जीने दो, हमराज, पपडोसन, सुजाता, मेरा साया , गुमराह , यादे आणि अनेक असे हिट चित्रपट सुनील दत्त यांनी बॉलीवूडला दिले.

नर्गिस आणि राज कपूर यांच्या लव्हस्टोरी बद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. नर्गिस यांचे राज कपूर यांच्यावर एवढे प्रेम होते कि त्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी बनण्यासही तयार होत्या. परंतु, काही कालावधीनंतर राज कपूर आणि नर्गिस यांचे संबंध तुटले. यानंतर त्या अनेक दिवस डिप्रेशनमध्ये होत्या.

सुनील दत्त यांचा शांत, संयमी स्वभाव आणि त्यांचा स्त्रियांबद्दलचा आदर पाहून नर्गिस प्रभावित झाल्या होत्या. सुनील यांनी नेहमीच त्यांच्या वाईट काळात साथ दिली. नर्गिस आणि सुनील दत्त यांची लव्हस्टोरी आजही अनेक जणांना प्रेरित करते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.