मुंबई – चित्रपट सृष्टीतील हरहुन्नरी अभिनेता ‘रितेश देशमुख’ याचा आज वाढदिवस… बॉलीवूडमध्ये वेगळी उंची गाठल्यानंतर मराठमोठ्या रितेशने मराठी चित्रपट सृष्टीकडे वळून ‘लयभारी’ पदार्पण केले. रितेश देशमुखचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी झाला.
3 जानेवारी 2012 रोजी जेनेलिया रितेश देशमुखबरोबर विवाहबद्ध झाली. रितेश आणि जेनेलियाचे लग्नाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता.
रितेशने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट सिनेरसिकांना दिले आहे. तसेच मराठीत सुपरहिट ठरलेला ‘लई भारी’ या चित्रपटाला रितेशने दुहेरी भूमिकेची किनार दिली आणि चाहत्यांना ‘लयभारी’ ट्रीट दिली. मात्र काही सिनेमांनी रितेश देशमुखला प्रोफेशनल आयुष्याबरोबरच पर्सनल आयुष्यात देखील खास मदत केली.