पुणे – वाढदिवस साजरा करण्याची प्रत्येकची पद्धत वेगवेगळी असते. आळंदीतील अविनाश बोरूंदिया यांनी अनाथ आश्रमातील मुलांची सोन्याच्या वस्तऱ्याने कटिंग करून आणि त्यांना 50 किलो किराणा साहित्य देऊन वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
चिखली येथील विकास अनाथ आश्रम येथे त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. बोरूंदिया यांनी नुकतेच श्री क्षेत्र आळंदी येथे रूबाब मेन्स पार्लर सुरू केले आहे. येथे त्यांनी काहीतरी विशेष म्हणून दाढी करण्यासाठी सोन्याचा वस्तरा ठेवला आहे. यामुळे पार्लरची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालीय. त्याच वस्तऱ्याने त्यांनी आज अनाथ मुलांची कटिंग करून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले.
यावेळी रूबाब मेन्स पार्लरचे अविनाश बोरुंदिया व त्यांचे सहकारी, युवराज कोळेकर, मोरया अकॅडमीचे संचालक नितीन साळी, विकास अनाथआश्रम चे संस्थाचालक माऊली हरकळ यांसह अनेकजण उपस्थित होते.