अभिनेता हृतिक रोशनने सोमवारी आपला 48 वा जन्मदिन साजरा केला. हृतिकने जन्मदिनाचे औचित्य साधत आपल्या चाहत्यांना एक स्पेशल भेट दिली. हृतिक विक्रम वेधा या तमीळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. वाढदिवसानिमित्त हृतिकने सोमवारी विक्रम वेढा चित्रपटातील आपला लुक शेअर केला. या फोटोला हृतिकने वेधा असं कॅप्शन दिलं आहे.
विक्रम वेधा हा मूळचा तमीळ चित्रपट असून यामध्ये आर माधवन व विजय सेथुपती यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. या चित्रपटाची स्टोरी ब्रिक्रम-वेताळ या दंतकथेवर आधारित असून यामध्ये एक प्रामाणिक पोलीस अधिकारी व तेवढ्याच ताकदीचा गुंड यांच्यामधील संघर्ष दाखवण्यात आला आहे. 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या या तमीळ चित्रपटाला प्रचंड यश मिळाले होते.
विक्रम वेधाचा हिंदी रिमेक आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यामध्ये हृतिक रोशन, सैफ अली खान व राधिका आपटे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
दरम्यान, वाढदवसानिमित्त हृतिकने शेअर केलेल्या विक्रम वेधामधील आपल्या लुकच्या फोटोमध्ये त्याने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केल्याचं दिसतंय. डोळ्यावर सिल्व्हर कडा असलेला काळ्या रंगाचा गॉगल घातलेल्या हृतिकच्या व्हीलेन लुकला तुफान पसंती मिळत आहे. मूळ चित्रपटात विक्रम या पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारलेल्या आर माधवन याने देखील हृतिकच्या या लुकची तारीफ केली आहे.