नवी दिल्ली – प्रसिद्ध उद्योगपती आदित्य बिर्ला यांच्या मुलीला अमेरिकेत वर्णद्वेषाला सामोरे जावे लागले आहे. अनन्या बिर्ला आणि त्यांच्या कुटुंबियांना कॅलिफोर्नियाच्या स्कोपा इटालियन रूट्स रेस्टॉरंटने बाहेर काढले. यासंदर्भातील अनुभव त्यांनी ट्विट करून सांगितला आहे.
अनन्या बिर्ला म्हणाल्या कि, स्कोपा इटालियन रूट्स रेस्टॉरंटने मला आणि माझ्या कुटुंबियांना परिसरातून बाहेर हाकलून दिले. हे खूप वेदनादायी आहे. तुम्हाला तुमच्या ग्राहकांसोबत योग्य पद्धतीने व्यवहार करण्याची गरज आहे.
This restaurant @ScopaRestaurant literally threw my family and I, out of their premises. So racist. So sad. You really need to treat your customers right. Very racist. This is not okay.
— Ananya Birla (@ananya_birla) October 24, 2020
आम्ही तुमच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी तीन तास प्रतीक्षा केली. परंतु, जोशुआ सिल्वरमैन नामक कर्मचाऱ्याने माझ्या आईसोबत अत्यंत चुकीचा व्यवहार केला. ज्याला वर्णभेद म्हंटले जाते. हे बरोबर नाही, असेदेखील अनन्या यांनी म्हंटले आहे.
We waited for 3 hours to eat at your restaurant. @chefantonia Your waiter Joshua Silverman was extremely rude to my mother, bordering racist. This isn’t okay.
— Ananya Birla (@ananya_birla) October 24, 2020
याबाबत आर्यमान बिर्ला ट्विट करत म्हटले कि, रेस्टॉरंटच्या परिसरात आम्हाला थांबूही दिले नाही. तसेच जेवण्यासाठी तीन तास ताटकळत रहावे लागले. त्यानंतरही आम्ही थांबलो होतो.
I have never experienced anything of this sort. Racism exists and is real. Unbelievable. @ScopaRestaurant https://t.co/FU0NE8e7Qu
— Aryaman Birla (@AryamanBirla) October 24, 2020
या घटनेचा सोशल मीडियावर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय अभिनेता रणविजय सिन्हा आणि करणवीर बोहरा यांनीही संताप व्यक्त केला आहे. याआधीही शिल्पा शेट्टी, प्रियंका चोप्रासह भारतातील प्रसिद्ध व्यक्तींना अशा भेदभावाला सामोरे जावे लागले होते.
दरम्यान, रेस्टॉरंटने सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. लेपार्ट्नर पाब्लो मोइक्सने म्हंटले कि, राज्याच्या कायद्यानुसार मद्य घेण्यासाठी ओळखपत्र दाखवणे गरजेचे आहे. हे ओळखपत्र केवळ दोघांकडे होते आणि बाकीच्यांकडे त्याची कॉपी होती. यावेळी ही परिस्थिती उद्भवली. यानंतर सर्व ठीक झाले आणि त्यांनी जेवण केले. एवढेच नव्हे तर दोन्ही वेटर आणि अन्नाच्या क्वालिटीची प्रशंसाही केली, असा दावा त्यांनी केला. बिर्ला कुटुंबीयांनी पुन्हा रेस्टॉरंटमध्ये यावे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.