“या’ देशात झाला “बर्ड फ्लू’चा मानवाला संसर्ग

जगातील पहिल्याच घटनेने धोका वाढला

मॉस्को – बर्ड फ्लूचा मानवाला संसर्ग होण्याचे पहिले उदाहरण समोर आले असून रशियामध्ये 7 व्यक्‍तीला या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. पक्षांपासून मानवाला संक्रमित होणाऱ्या या विषाणूला ए (एच 5 एन बी) असे संबोधण्यात आले आहे. या प्रकरणाबाबत तातडीने जागतिक आरोग्य संघटनेला कळवण्यात आले आहे. “डब्लूएचओ’ने तातडीने या प्रकरणाची दखल घेतली असल्याचे ‘रोसपोट्रेबनाझदोर’ या ग्राहक संरक्षण संस्थेच्या प्रमुख ऍना पोपोवा यांनी सांगितले.

बर्ड फ्लूच्या विषाणूचा मानवाला संसर्ग झाल्याबद्दल रशियाने काही दिवसांपूर्वीच “डब्लूएचओ’ला कळवले आहे. मात्र मानवाकडून या विषाणूचे संक्रमण इतरांना होत असल्याचे आतापर्यंत आढळलेले नाही. योग्य प्रकारे शिजवलेले मांस आहारासाठी सुरक्षित आहे. मात्र कुक्कुटपालन उद्योगातील जिवंत अथवा मृत पक्षांचा थेट संपर्क झाल्यावरच बर्ड फ्लूचा संसर्ग मानवाला होण्याची शक्‍यता असते, असे मानले जात आहे.

बर्ड फ्लूला कारणीभूत असलेल्या “एच 5 एन बी’ या विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या काही महिन्यांमध्ये रशिया, युरोप, चीन, मध्यपूर्व आणि उत्तर आफ्रिकेमध्ये झाला आहे. या ठिकाणच्या केवळ कुक्कुटपालन उद्योगांमध्येच या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळले होते. “एच 5 एन 1′,”एच 7 एन 9′ आणि “एच 9 एन 2′ या विषाणूंचा मानवाला संसर्ग होत असल्याची माहिती आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.