मुंबई – सध्या बायोपिकचा जमाना आहे. अनेक खेळाडू, गाजलेले अभिनेते, राजकीय नेते आणि अगदी कुख्यात गुंडांवरही बायोपिक बनून झाले आहेत. आता लवकरच ‘स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर’ यांच्या जीवनावरही एक बायोपिक बनविण्यात येणार आहे. या बायोपिकच शूटिंग जून महिन्यापासून सुरु होणार असून, लंडन, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार द्विपसमूहातील विविध ठिकाणी याचं चित्रीकरण करण्यात येणार आहे.
दरम्यान, स्वातंत्र्यसैनिक वीर सावरकर या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता ‘रणदीप हुड्डा’ सावरकरांच्या मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन मराठमोळे दिग्दर्शक महेश मांजरेकर करणार आहे. वीर सावरकर यांच्या या बायोपिक मधून भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर वेगळ्या दृष्टीकोनातून प्रकाश टाकण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा अभिनेता रणदीप हुड्डा याने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.
View this post on Instagram
रणदीप आपल्या पोस्ट मध्ये म्हणतो की….”कुछ कहानियाँ बताई जाती है और कुछ जी जाती है…’ (काही कथा सांगितल्या जातात तर काही जगल्या जातात) असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे. निर्माते संदीप सिंग आणि आनंद पंडित यांनी वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीपची निवड केली आहे.