अभिषेकसाठी बिग बींचे इमोशनल ट्विट

मुंबई – भारतीय चित्रपटसृष्टीत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बॉलिवूडमधील करिअरला नुकतेच 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बी नेहमीच सोशल प्लॅटफार्मवर अक्टिव्ह असतात, तसेच आपल्या आयुष्यातील अनेक आठवणींना ते सोशल प्लॅटफार्मद्वारे फॅन्स सोबत शेअर करीत असतात.

अमिताभ यांनी पुन्हा एकदा ट्विट करत मुलगा अभिषेक यांच्या लहापणीच्या आठवणीला उजाळा दिला आहे. अमिताभ ट्विटमध्ये अभिषेक यांनी लिहिलेल्या पत्राचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी ‘पूत सपूत तो क्यूँ धन संचय ; पूत कपूत तो क्यूँ धन संचय’ या म्हणीद्वारे सूचक विचार मांडले आहे.

दरम्यान, या फोटोतील पत्र हे अभिषेकने त्याच्या बालपणी अमिताभ बच्चन शूटिंग साठी घरापासून लांब असतांना लिहिले आहे. लवकरच अमिताभ ‘झुंड’, ‘गुलाबो सिताबो’, ‘ब्रह्मास्त्र’सारखे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.