बर्मिंगहॅम – राष्ट्रकुल स्पर्धेत बिंदियाराणी देवीने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 55 किलो वजनी गटात शानदार कामगिरी करत एकूण 202 किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या मीराबाई चानूनंतर 23 वर्षीय बिंदियाराणीने स्नॅच वर्गात 86 किलो वजन उचलत आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले.
त्यानंतर क्लीन एँड जर्कमध्ये 116 किलो वजन उचलत तिने इतिहास रचला आहे. नायजेरियाच्या अदिजत अदेनिके ओलारिनोयेने एकूण 203 किलो वजनासह सुवर्णपदक जिंकले. बिंदयाराणी दुसरा प्रयत्नात 114 किलो वजन उचलण्यात अयशस्वी ठरल्याने तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले. इंग्लंडच्या फ्रेअर मॉरोने 198 किलो वजनासह (89 किलो + 109 किलो) कांस्यपदक जिंकले.
That’s medal No 4 in weightlifting 🏋🏻♀️ for Team 🇮🇳! Bindiyarani Devi wins the 🥈 in the 55 KG category lifting a total of 202 KG! Great day for #teamindia at @birminghamcg22 #EkIndiaTeamIndia #B2022 pic.twitter.com/2hCKVxwJ41
— Team India (@WeAreTeamIndia) July 31, 2022
तिच्या या दैदिप्यमान यशप्राप्तीनंतर भारताचे राष्ट्रतपी दौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रौप्य पदक विजेत्या बिंदियाराणीला शुभेच्छा दिल्या आहे.
राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटले आहे की, राष्ट्रकुल खेळांमध्ये वेटलिफ्टिंगमधील महिला 55 किलो वजनी गटातून रौप्य पदक जिंकणाऱ्या बिंदियाराणीचे अभिनंदन. तू तुझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केले आणि खेळाचा स्तर उंचावण्यासाठी जल्लोषाने प्रदर्शन केले. प्रत्येक भारतीयाला तुझ्या यशाचा आनंद आहे.