अभिनेत्री प्रियांका चोप्राचा आज वाढदिवस.. तिच्या नावावर विविध प्रकारचे रेकॉर्ड आहेत. आपण आज जाणून घेऊयात तिच्या नावावर नेमके काय रेकॉर्ड आहेत.
यातच दरवर्षीप्रमाणे इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. सन 2019 मध्ये इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींमध्ये दोन भारतीय स्टार आहेत. या यादीत प्रियांका चोप्रा आणि विराट कोहली या दोन भारतीय सेलिब्रिटींनी स्थान मिळविले आहे.
हॉपरहिक वेबसाइटने गतवर्षी इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्यांची यादी जाहीर केली असून, यात प्रियांका चोप्रा 28व्या, तर भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली 23व्या स्थानावर आहे. मागील वर्षी प्रियांका 19व्या आणि कोहली 23व्या क्रमांकावर होते. प्रियांका चोप्राला एका पोस्टवर सुमारे 2.15 कोटी रुपये, तर विराट कोहलीने एका पोस्टवरून सुमारे 2.21 कोटी रुपये कमावले आहेत.
या यादीमध्ये “फास्ट अँड फ्यूरियस’ स्टार ड्वेन जॉन्सन पहिल्या क्रमांकावर आहे, तर काइली जेनर दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि चौथ्या क्रमांकावर किम कार्दाशियन यांचा समावेश आहे. एरियाना ग्रॉडे, सेलेना गोमेज, बेयॉन्से नोल्स, जस्टीन बीबर, टेलर स्विफ्ट आणि फुटबॉलपटू नेमार जुनियर यांचा अनुक्रमे सहा ते दहावा क्रमांक लागतो. दरम्यान, मागील वर्षी देखील या यादीमध्ये केवळ दोन भारतीय नामांकित व्यक्तींचा समावेश होता.