कोट्यवधींची झोपडी

जगात महागड्या घरांची संख्या कमी नाही. भारताची आर्थिक राजधानी मुंबईत देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या आलिशान अँटीला इमारतीवर अब्जावधींचा खर्च झाला आहे. अशा प्रकारचे असंख्य बंगले जगभरात आहेत. ही घरे आपल्या सौदर्यांने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेत आहेत. अशा घराची किंमत किमान कोटींच्या घरात असते. सर्वसामान्यांच्या कल्पनेपलीकडे या घरांच्या किमती असतात. मात्र जगात एक अशा प्रकारची झोपडी देखील आहे, की त्याची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल.

एखादी झोपडी कोटीच्या घरात विकली जाऊ शकते, यावर तुमचा विश्‍वास बसेल का? गेल्यावर्षी सोशल मीडियात ही कोट्यवधीची झोपडी चर्चेत राहिली. हे प्रकरण इंग्लंडचे असून तेथे साध्या स्थितीत दिसणारी झोपडी कोटींच्या भावाने विकली गेली होती. जेव्हा या झोपडीबाबत लोकांना कळाले तेव्हा ते किंमत पाहून दंग झाले. बाहेरून ही झोपडी निश्‍चितच साधी वाटते. मात्र, ती दहा कोटीला विकली गेली होती. सर्वसाधारण वाटणाऱ्या झोपडीची अंतर्गत सजावट पाहून तुम्ही थक्क व्हाल. एखाद्या बंगल्याप्रमाणे आतील सजावट आहे. आतमध्ये गेल्यावर आलिशान घराचा लूक आपल्याला पाहावयास मिळेल. या झोपडीत तीन बेडरूमचे घर आहे. त्याची निर्मिती 1964 मध्ये झाली होती. 2016 मध्ये त्याच्या मालकाने घराचे इंटरियर नव्याने करून ती झोपडी दहा कोटीला विकली. एवढेच नाही तर या झोपडीत असंख्य सेलिब्रेटिज राहून गेले आहेत. इंग्लंडप्रमाणेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियातही अशीच जर्जर झोपडी आहे. तिची आतमधील रचना शानदार आहे. सिलिकॉन व्हॅलीमध्ये जर्जर अवस्थेतील ही झोपडी कोटीच्या भावाने विकली गेली. एका व्यक्तीने ही झोपडी 6 कोटी 70 लाख रुपयांत खरेदी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.