उमेदवारांची कोट्यावधींची मालमत्ता

सचिन दोडके यांची 44 कोटी 31 लाख 84 हजारांची संपत्ती
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खडकवासला मतदार संघातील उमेदवार सचिन दोडके यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती 44 कोटी 31 लाख 84 हजार रुपये आहे. त्यामध्ये दोडके यांच्या नावावर 43 कोटी 90 लाख 79 हजार रुपये मालमत्ता असून, त्यामध्ये स्थावर मालमत्ता 42 कोटी 69 लाख 25 हजार रुपये इतकी आहे. जंगम मालमत्ता किंमत 1 कोटी 21 लाख 53 हजार रूपये आहे. 44 ग्रॅम सोने आणि 1 किलो चांदीचा या मालमत्तेमध्ये समावेश आहे. त्यांनी आतापर्यंत तीन कोटींची मालमत्ता खरेदी केली असून, 4 कोटी 65 लाख रुपयांचे कर्ज आहे. तसेच पत्नी सोनाली दोडके यांच्या नावावर 41 लाख 5 हजार 676 रुपयांची मालमत्ता असून, जंगम मालमत्ता 24 लाख, स्थावर मालमत्ता 17 लाख इतकी आहे.

अरुण गायकवाड यांच्याकडे अडीच कोटींची मालमत्ता
बसपाकडून अरुण गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांनी कुटुंबाची एकूण संपत्ती 2 कोटी 45 लाख 36 हजार रूपये इतकी जाहीर केली आहे. त्यामध्ये अरुण गायकवाड यांच्या नावावर 1 कोटी 12 लाख 26 बदाप तर पत्नी उज्ज्वला गायकवाड यांच्या नावावर 1 कोटी 33 लाख रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्याकडे तब्बल 2 किलो सोने असून (40 लाख रुपये) पत्नीकडे 5 तोळे सोने आहे.

अश्‍विनी कदम यांच्याकडे पावणेदोन कोटींची संपत्ती
अश्‍विनी कदम यांनी अर्ज दाखल करताना संपत्तीचे विवरण पत्र निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले. त्यात कदम यांचे एकूण 1 कोटी 83 लाख 84 हजार 590 एवढी संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यात जंगम मालमत्ता 56 लाख 75 हजार 939 रुपये, स्थावर मालमत्ता 1 कोटी 27 लाख 8 हजार 651 रुपये एवढी आहे. तसेच एक दुचाकी, सुझुकी ऍक्‍सेस, 380 ग्रॅम दागिन्याचा समावेश आहे.

सुनील टिंगरे यांच्याकडे 30 कोटी 89 मालमत्ता
वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार सुनील टिंगरे यांची स्थावर व जंगम अशी एकूण 30 कोटी 89 लाख रुपयांची मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी त्याची माहिती नोंदविलेली आहे. टिंगरे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांच्या स्वत:च्या नावावर 5 कोटी 82 लाख 56 हजार 970 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. विविध बॅंकांमध्ये ही रक्‍कम ठेवींच्या स्वरुपात आहे. पत्नीच्या नावे 11 लाख 92 हजार 628 रुपये आहेत. टिंगरे यांच्या स्वत:कडे 40 ग्रॅम सोने असून त्यांच्या पत्नीकडे 220 ग्रॅम सोने आहे. टिंगरे यांच्याकडे तब्बल 1 कोटी 74 लाख 59 हजार 147 रुपये एवढ्या रकमेची मोटारवाहने आहेत. यात स्कोडा, बीएमडब्लू, मर्सिडीस बेंज, इनोव्हा, लॅन्सर, जिप्सी कार, हिरो होंडा पॅशन मोटार सायकल, हिरो होंडा प्लेजर, यामाहा आदी वाहनांचा समावेश आहे. स्वत:च्या नावे असलेली स्थावर मालमत्ता ही तब्बल 25 कोटी 6 लाख 86 हजार 378 रुपये एवढी आहे. यात जमीन व इमारतीचा समावेश आहे. पत्नीच्या नावे 18 कोटी 64 लाख 46 हजार 416 रुपयांची मालमत्ता दाखविण्यात आलेली आहे. वडिलोपार्जित मालमत्ता 11 कोटी 59 लाख 37 हजार 656 रुपये आहे. टिंगरे यांनी स्वत: खरेदी केलेल्या मालमत्तेचे बाजारमूल्य 11 कोटी 62 लाख 22 हजार रुपये 202 रुपये आहे. टिंगरे यांच्या नावावर विविध बॅंकांमध्ये 1 कोटी 71 लाख 54 हजार 332 रुपये दाखविण्यात आलेले आहेत. याबरोबरच्या त्यांच्या नावावर फौजदारी खटले प्रलंबित असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

भोसले यांच्याकडे 1 कोटी 66 लाखांची मालमत्ता
वडगावशेरी विधानसभा मतदार संघातून शिवसेना नगरसेवक संजय भासले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून यांच्याकडे स्थावर व जंगम अशी एकूण 1 कोटी 66 लाख रुपये एवढी मालमत्ता प्रतिज्ञापत्रात समाविष्ट करण्यात आलेली आहे. भोसले यांची 1 कोटी 58 लाख 80 हजार 458 रुपये अशी जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 100 ग्रॅम सोने असून त्याची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे. इंडिका, बजाज रिक्षा, ऍक्‍टिव्हा अशी वाहनेही त्यांच्याकडे आहेत. पत्नीच्या नावे 4 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 120 ग्रॅम सोने आहे. स्थावर मालमत्ता ही केवळ 8 लाख रुपयांची आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.