अलास्का – फ्रेंच अब्जाधीश, राजकारणी आणि डॅसॉल्ट विमान बनविणाऱ्या कुटूंबाचे वंशज असलेले ऑलिव्हियर दासॉल्ट यांचे हेलिकॉप्टर अपघातात याच महिन्यात अपघाती निधन झाले होते. त्यापाठोपाठ आणखी एका अब्जाधीश उद्योगपतीचं हॅलिकॉप्टर अपघातातच मृत्यू झाला आहे. पीटर केलनर असं या मृत उद्योगपतीच नाव असून ते चेक प्रजासत्ताकमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.
अमेरिकेच्या अलास्कातील कमी लोकसंख्येच्या ग्रामीण भागात एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. यामध्ये पायलटसह चार लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये झेक प्रजासत्ताकच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती पीटर केलनर यांचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.
अपघातग्रस्त हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यात आले होते. ते एका लॉ़जवरून गाईड आणि काही पाहुण्यांना घेऊन जात होते. अलास्काच्या स्टेट ट्रूपरनी सांगितले की शनिवारी ज्या लोकांचा अपघात झाला त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या लोकांमध्ये झेक प्रजासत्ताकचे अब्जाधीश पीटर केलनर यांचा समावेश आहे. फोर्ब्स २०२० यादीनुसार त्यांच्याकडे १७ अब्ज डॉलरची संपत्ती होती. ते ५६ वर्षांचे होते.
आर्थिक, टेलिकम्युनिकेशन, इंजिनिअरिंग आणि इंन्शुरन्स क्षेत्रामध्ये कंपन्यांच्या पीपीएफ या समुहाचे पीटर केलनर मालक होते. या कंपन्यांमध्ये ९४००० लोक काम करतात.