बिजु जनता दलही भाजपच्या विरोधात

भुवनेश्‍वर : आत्तापर्यंत विरोधकांची आघाडी आणि भारतीय जनता पक्षाला समांतर अंतरावर ठेवणाऱ्या बिजू जनता दल या पक्षानेही आता तृणमुल कॉंग्रेसची पाठराखण करीत भारतीय जनता पक्षाच्या सरकारवर जोरदार टीका केली आहे. आज या पक्षाने आपला राजकीय रोख प्रथमच स्पष्ट केला आहे. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मोदी सरकारने सीबीआय या यंत्रणेचा राजकीय कारणासाठी दुरूपयोग सुरू केला असल्याचा आरोप बिजू जनता दलाने केला आहे. त्यांनी प्रथमच अशा प्रकारे भाजपला विरोध दर्शवणारी भूमिका घेतल्याने त्याला विशेष महत्व दिले जात आहे.

या संबंधात पक्षातर्फे जे निवेदन जारी करण्यात आले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की सीबीआय सारख्या महत्वाच्या संस्थेची प्रतिष्ठा सरकारने जपली पाहिजे होती. आपली लोकशाही आता प्रगल्भ लोकशाहीं म्हणून ओळखली जात आहे. त्यामुळे सरकारने तशी वागणूक ठेवणे अपेक्षित होते. ओडिशातही पंचायत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर सीबीआयचा वापर करून येथेही राजकीय दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला होता. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा असा दुरूपयोग सुरू झाला आहे असा आरोपही बिजू जनता दलाने केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)