Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 (Rajgir, India vs China) : भारतीय महिला हॉकी संघ आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. विजेतेपदाच्या लढतीत टीम इंडियाचा सामना चीनशी होणार आहे. चीनचा पराभव करताच भारतीय संघ विजेतेपद पटकावणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत या स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांची फायनल जिंकण्याची शक्यता खूप जास्त आहे. तर जाणून घेऊया की, तुम्ही हा विजेतेपदाचा सामना कधी, कुठे आणि कसा पाहू शकाल.
सामना कधी होणार?
भारत आणि चीनच्या महिला संघांमध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी विजेतेपदाचा सामना आज, बुधवार, 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:45 वाजता सामना सुरू होईल.
The stage is set for an electrifying final at the Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024! 🌟 India and China have battled their way through to secure their spot in the final 🇮🇳🇨🇳🏑
Both teams have shown incredible skill, determination, and passion throughout the… pic.twitter.com/kkXHalXguA
— Hockey India (@TheHockeyIndia) November 20, 2024
सामना कुठे होणार?
भारत आणि चीन यांच्यातील विजेतेपदाचा सामना बिहारमधील राजगीर स्टेडियमवर होणार आहे.
लाईव्ह टेलिकास्ट कुठे होणार?
भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण सिनो स्पोर्ट्सच्या माध्यमातून भारतात होणार आहे.
लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे बघायचे?
भारत आणि चीन यांच्यातील अंतिम सामना सोनी लाइव्ह ॲपद्वारे भारतात थेट प्रक्षेपित केला जाईल.
भारत विरुद्ध चीन हेड टू हेड…
भारत आणि चीनच्या महिला संघांमध्ये आतापर्यंत 46 सामने झाले आहेत. भारताने 12 सामने जिंकले आहेत तर चीनने 28 सामने जिंकले आहेत. या दोघांमध्ये एकूण 6 सामने अनिर्णित राहिले आहेत.
गुणतालिकेत भारत अव्वल स्थानावर
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. फायनलमध्ये पोहोचेपर्यंत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. पाचही सामने जिंकून टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत जपानविरुद्ध 3-0 असा विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. याआधी ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडियाने एकूण 26 गोल केले होते, तर त्यांच्याविरुद्ध फक्त 2 गोल झाले होते.