Bihar Women’s Asian Champions Trophy 2024 (Rajgir) : – भारताने मलेशिया व दक्षिण कोरिया संघांना पराभूत करताना आशियाई महिला चॅम्पियन्स हॉकी मध्ये अजूनही अपराजित आहे. दोन विजयामुळे आत्मविश्वासाने भरलेला भारतीय संघासमोर गुरुवारी (4.45 PM) थायलंडचे आव्हान असणार आहे. या लढतीत भारतीय संघ थायलंड विरुद्ध मोठ्या विजय साकारण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
भारताने आणि सध्याचा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता संघ चीन या दोन्ही संघानी आतापर्यंत आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. मात्र गोलतुलनेत भारतीय संघ चीनच्या खूप मागे आहे. भारताने मलेशियाला ४-० असे तर दक्षिण कोरियाला ३-२ असे पराभूत केले होते. भारत तुलनेने कमकुवत असलेल्या थायलंड विरुद्ध मोठा विजय मिळवून चीन व भारतामधील गोलचे अंतर कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
🏑𝙈𝙖𝙩𝙘𝙝 𝙏𝙞𝙢𝙞𝙣𝙜𝙨 𝘼𝙡𝙚𝙧𝙩 🏑
The Bihar Women’s Asian Champions Trophy Rajgir 2024 matches have been rescheduled to early hours. Catch all the action as per the new timings:
– 1st Match: 12:15 PM IST
– 2nd Match: 2:30 PM IST
– 3rd Match: 4:45 PM ISTDont… pic.twitter.com/sLHMDe6bNM
— Hockey India (@TheHockeyIndia) November 9, 2024
सध्याच्या घडीला गुणतालिकेमध्ये चीन अव्वल स्थानी असून भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारतानंतर जापान तिसऱ्या तर दक्षिण कोरिया चौथ्या स्थानावर आहे. सहा संघामध्ये खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करणार आहेत. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या होत्या, मात्र त्यांना अपेक्षित असणारे गोल करता आले नाही.
भारताने पहिल्या सामन्यात ४-० तर दुसऱ्या सामन्यात ३-२ अशा कमी फरकाने विजय मिळविला होता. यावर भारतीय संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग हे देखील संघाच्या कामगिरीवर समाधानी नाहीत. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आम्ही आणखी गोल करू शकलो असतो, मात्र आम्ही घाई केली. त्यामुळे आम्ही योग्य संधीची वाट पाहणे अपेक्षित होते. मागील लढतीमध्ये ज्या चुका केल्या, त्या चुका पुढील सामन्यामध्ये टाळण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
गुरुवारी भारत थायलंड विरुद्ध विजयाच्या निर्णधाराने उतरेल. यानंतर भारतासमोर जपानचे आव्हान असणार आहे. या लढतीपूर्वी भारत उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल. उद्या दक्षिण कोरिया समोर मलेशिया संघाचे तर चीन समोर जपान संघाचे आव्हान असणार आहे.
#BiharWACT2024 : भारताचा विजयी धडाका कायम, दुसऱ्या सामन्यात द. कोरियाचा उडवला धुव्वा…
पेनल्टी कॉर्नरचा प्रश्न कायम
पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करू न शकणे हाही भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. मलेशियाविरुद्ध भारताला ११ पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. परंतु त्यापैकी केवळ तीन पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करू शकले. दक्षिण कोरियाविरुद्ध भारताला आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले पण त्यांचा फायदा उठवता आला नाही. फॉरवर्ड संगीता कुमारी आणि दीपिका यांची आतापर्यंतची कामगिरी भारतासाठी सकारात्मक बाब आहे. या दोघांनी आतापर्यंत प्रत्येकी तीन गोल केले आहेत. शर्मिला देवी, प्रीती दुबे, ब्युटी डुंगडुंग यांना अधिक जबाबदारी घ्यावी लागेल. कर्णधार सलीमा टेटे आणि उपकर्णधार नवनीत कौर यांना मधल्या फळीत चांगला खेळ करावा लागेल.