पुणे – बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल ( Bihar Election Result 2020 ) आज जाहीर होणार आहेत. अजूनही मतमोजणी चालूच आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात (Bihar Election Result 2020) वारंवार मोठे बदल होताना दिसत आहे. सध्या एनडीए 122 तर महागठबंधन 113 आणि इतर 8 जागेवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड यश मिळाल्यानंतर महाराष्ट्र भाजपनेही राज्यात जल्लोष सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी बिहार देवेंद्रजीनी आणले असे ट्विट करत म्हटले आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात, बिहार देवेंद्रजी नी आणले.. आता.. महाराष्ट्र ला पण देवेंद्रजीच पाहिजे.. पुन्हा येणार..येणारच!!!
बिहार देवेंद्रजी नी आणले..
आता..
महाराष्ट्र ला पण देवेंद्रजीच पाहिजे..
पुन्हा येणार..येणारच!!!— nitesh rane (@NiteshNRane) November 10, 2020
दरम्यान, बिहारमध्ये भाजप 72 जागांवर आघाडीवर आहे. या कलानुसार निकाल लागला तर भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊ शकतो. पण सध्या मतमोजणी चालू असून मतमोजणी पूर्ण झाल्यावर निकालचं चित्र बदलू शकते.