‘या’ राज्याला जाहीर करणार दुष्काळ ग्रस्त 

संग्रहित छायाचित्र
पटना: राज्यातील दुष्काळ सदृश्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहार विधानसभेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या चर्चेमध्ये बोलताना “येत्या तीन दिवसांमध्ये बिहारमध्ये जर सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला तर सरकार राज्याला ‘दुष्काळग्रस्त’ जाहीर करेल” असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री प्रेम कुमार यांनी दिले. राज्यातील सद्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार आपत्ती व्यवस्थापन विभागाबरोबर ३१ जुलै रोजी बैठक घेणार असून जर गरज भासली तर मुख्यमंत्री त्याच दिवशी राज्याला दुष्काळग्रस्त घोषित करतील अशी माहिती देखील त्यांनी दिली.
“राज्यसरकारने शेतकऱ्यांसाठी डिझेलवर असणारी सबसिडी ३५ रुपयांवरून ५० रुपयांपर्यंत वाढवली असून ग्रामीणभागामध्ये वीजदर देखील ९६ पैशांवरून ७५ पैसे एवढा कमी केला आहे. बिहार सरकारने चालू वर्षामध्ये डिझेल सबसिडी साठी ६० करोड तर पर्यायी पिकांसाठी १५ करोड सबसिडीची तरतूद केली आहे” अशी माहिती त्यांनी विधानसभेत बोलताना दिली.
विरोधी पक्ष नेते तेजस्वी कुमार यांनी केवळ १०,००० शेतकऱ्यांची राज्यसरकारच्या विविध योजनांसाठी नोंदणी करण्यात आल्याचा आरोप केला. या आरोपांचे खंडन करत कृषिमंत्री कुमार यांनी आत्तापर्यंत ३,२३,६७६ शेतकऱ्यांची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करून घेण्यात आल्याची माहिती दिली.
तत्पूर्वी दुष्काळ सदृश्य स्थितीचा आढावा घेण्यासाठी विधानसभेमध्ये विशेष चर्चेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. परंतु चर्चासत्र सुरु असताना कृषिमंत्री देत असलेली माहिती खोटी असल्याचा आरोप करत राजद, काँग्रेस व सीपीआय या विरोधी पक्षांच्या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)