मुझ्झफरपूर – बिहार राज्यातील मुझ्झफरपूर मध्ये प्रेम प्रकरणातून एका 17 वर्षीय मुलाची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीच्या कुटुंबीयांनी एवढ्यावरच न थांबता त्या मुलाचे गुप्तांग छाटल्याचे अमानूष कृत्य केले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
मुझ्झफरपूर जिल्ह्यातील रेपुरा रामपूरशाह येथे हा प्रकार घडला आहे. सौरभ कुमार असे या 17 वर्षीय मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर सौरभच्या संतापलेल्या नातेवाईकांनी आरोपींच्या घरासमोरच सौरभच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सुशांत पांडेय ऊर्फ विजय कुमारला पोलिसांनी अटक केली आहे. यासह अन्य् तिघांना अटक करण्यात आली आहे.
सौरभच्या मृत्यूने संतापलेल्या जमावाने आरोपींच्या घरात तोडफोड करण्याचा प्रयत्न केला. तणावजन्य स्थिती पाहून गावात पोलीस तैनात करण्यात आले आहेत, असे पोलीस अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितले आहे.