पटना – बिहारमध्ये जेडी(यु)चे अध्यक्ष नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीचे सरकार स्थापन करण्यात आले आहे. नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून तारकिशोर प्रसाद व रेणू देवी हे दोघे कार्यभार सांभाळणार आहेत. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह अन्य काही मंत्र्यांचा शपथविधी सोहळा काल पार पडला.
सोमवारी शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर आज खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. मागील सरकारप्रमाणे यंदाही गृहमंत्रालय मुख्यमंत्री नितीश कुमार हेच सांभाळणार आहेत. तर सुशील मोदी यांच्या जागी संधी देण्यात आलेले उपमुख्यमंत्री तारकिशोर प्रसाद यांच्याकडे यापूर्वीच्या सरकारमध्ये मोदी सांभाळत असलेली सर्व खाती देण्यात आली आहेत. यामध्ये अर्थ खात्याचाही समावेश आहे.
तर सरकारमधील दुसऱ्या उपमुख्यमंत्री रेणू देवी यांच्याकडे पंचायती राज विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. याखेरीज विजय चौधरी यांना ग्रामविकास, जलसंपदा आणि संसदीय कार्य मंत्रालय देण्यात आले आहे. तर जेडीयू कोट्यातून आलेल्या अशोक चौधरी यांना बांधकाम आणि अल्पसंख्याक कल्याण मंत्री करण्यात आले आहे. मेवालालाल चौधरी यांच्याकडे शिक्षण, मंगल पांडे यांच्याकडे आरोग्य व रस्ते बांधकाम विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वाचा कोणाकडे कोणती जबाबदारी?
मुख्यमंत्री नितीश कुमार- गृह, सामान्य प्रशासन, कॅबिनेट, दक्षता (वाटप न झालेली खाती)
तारकिशोर प्रसाद – वित्त, वाणिज्य कर, पर्यावरण व वन, माहिती तंत्रज्ञान, आपत्ती व्यवस्थापन, नगरविकास विभाग.
रेणु देवी – पंचायती राज, मागासवर्गीयांची उत्थान आणि ईबीसी कल्याण, उद्योग.
विजय चौधरी – ग्रामीण अभियांत्रिकी विभाग, ग्रामीण विकास विभाग, जलसंपदा, माहिती व प्रसारण, संसदीय कार्य.
बिजेंद्र यादव – ऊर्जा, बंदी, नियोजन, अन्न व ग्राहक व्यवहार मंत्रालय.
मेवालालाल चौधरी – शिक्षण
शीला कुमारी – वाहतूक
संतोष मांझी – लघु पाटबंधारे, एससी / एसटी कल्याण
मुकेश साहनी – पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनासाठी
मंगल पांडे – आरोग्य, रस्ते आणि कला आणि संस्कृती विभाग
अमरेंद्र सिंह- कृषी, सहकार व ऊस विभाग
रामप्रीत पासवान – पीएचईडी
जीवेश कुमार – पर्यटन, कामगार व खाण विभाग
Bihar portfolio allocation: Mukesh Sahni gets Animal Husbandry and Fishery, Mangal Pandey gets Health and Art and Culture and Bijendra Yadav gets Energy, Planning and Food and Consumer Affairs https://t.co/RWHyJxNpW7
— ANI (@ANI) November 17, 2020