नवी दिल्ली: मतदान यंत्रावरील कोणताही उमेदवार पसंत नसेल तर तसे मत नोंदवण्यासाठी निवडणूक आयोगाने या यंत्रावर नोटाचाहीं पर्याय दिला आहे. नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानानुसार बिहार मध्ये नोटाच्या पर्यायाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. हे प्रमाण एकूण मतदानाच्या दोन टक्के इतके आहे अशी माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.
उत्तरप्रदेश, गुजरात, आणि पश्चिम बंगाल मध्ये हे प्रमाण अनुक्रमे 0.84, 1.38 आणि 0.86 टक्के इतके आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन 2013 पासून मतदान यंत्रावर हा पर्याय ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सन 2014 साली झालेल्या लोकसभेच्या निवडुकीत पहिल्यांदा हा पर्याय वापरण्यात आला. त्या निवडणुकीत संपुर्ण देशात एकूण 60 लाख मतदारांनी हा पर्याय निवडला होता.