दुर्दैवी! शिंपले गोळा करताना अचानक वेगात आले पाणी, पाच मुलींचा तलावात बुडून मृत्यू

बिहार – बिहारमधील पुर्व चंपारण जिल्ह्यात तलावात बु़डून पाच मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रामगढवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील अहिरोलिया गावात ही घटना घडली आहे. मृतामध्ये ४ ते १२ वर्षाच्या मुलींचा समावेश आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोशिला कुमारी,वय १०, सीमा कुमारी,वय४, सुग्गी कुमारी,वय १२, संगीता कुमारी,वय १२, आणि शोभा कुमारी, वय १२ असे मृत मुलींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ह्या मुली तलावात शिंपले व गोगलगाय गोळा करण्यासाठी गेल्या होत्या त्यासाठी त्यांनी एक साखळी तयार केली होती. त्या साखळीच्या सहाय्याने तलावात खोलात गेल्या मात्र त्यावेळी विरुद्ध दिशेने वेगात पाणी आले. हे कळताच पाचही मुलींनी तलावातून बाहेर निघण्यास पळू लागल्या मात्र त्यावेळी त्या पाण्यात पडल्या व त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.