पाटणा – बिहार विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठीचा प्रचार गुरूवारी सायंकाळी समाप्त झाला. आता त्या राज्यात अखेरच्या टप्प्यासाठी शनिवारी मतदान होईल.
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत.
त्यातील 78 जागांसाठी शेवटच्या टप्प्यात मतदार त्यांचा हक्क बजावतील. त्यामुळे 1 हजार 200 हून अधिक उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद होईल. बिहारमध्ये प्रामुख्याने जेडीयू-भाजपचा समावेश असणारी सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत सत्तेसाठी मुकाबला होणार आहे.
एनडीएमधून बाहेर पडून यावेळी लोजप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरा जात आहे. त्यामुळे निवडणुकीतील रंगत आणखीच वाढली आहे. बिहारमध्ये सत्तापरिवर्तन होणार की नाही याचे उत्तर 10 नोव्हेंबरला जाहीर होणाऱ्या निकालातून मिळेल.