बिहार निवडणुक : 1980 साली संजय गांधींनी शब्द दिला होता अन्…

पटना – कोणत्याही नेत्याला मंत्री पद देतेवेळी खुप विचार केला जातो. मात्र, संजय गांधी यांनी आपल्या पक्षातील उमेदरासीठी प्रचार करतानाच मंत्रीपद देण्याची घोषणा केली होती. उमेदवाराला निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर त्यांनी दिलेले वचन पूर्ण केले.

1980 साली जनता पार्टीचं सरकार पडल्यानंतर बिहारमध्ये विधानसभा निवडणुक झाली. या निवडणुकीत काॅंग्रेसचा विजय झाला. त्यावेळी पटना पश्चिम विधानसभा भागातून संजय गांधी यांनी त्यांचे मित्र आरएचपी सिन्हा यांचे पुत्र रंजीत सिन्हा यांना काॅंग्रेसकडून तिकीट दिले होते.

रंजीत सिन्हा यांच्या प्रचारासाठी संजय गांधी स्वत: पटना येथे आले होते. निवडणुकीत रंजीत सिन्हा यांचा विजय झाला तर त्यांना मंत्री पद देण्यात येईल अशी घोषणा त्यांनी केली होती. रंजीत सिन्हा यांनी त्या निवडणुकीत
मोठ्या मतांनी विजय मिळवला. त्यानंतर संजय गांधी यांनी आपले वचन पूर्ण करत जगन्नाथ मिश्र आणि त्यानंतर चंद्रशेखर सिंह यांच्या सरकारमध्ये रंजीत सिन्हांना राज्यमंत्री पद दिले.

त्यावेळी बिहार विधानसभा निवडणुकीत काॅंग्रेसने 169 जागांवर विजय मिळवला आणि पूर्ण बहुमताचे सरकार बनवले. निवडणुकीपुर्वी संजय गांधी यांनी मुस्लिम मतदारांना मनवण्यासाठी नसबंदी कार्यक्रमाविषयी माफी मागितली होती. नंतर मुस्लिम मतदारांनीही मोठ्या प्रमाणात काॅंग्रेसला मतदान केले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.