बिहार : काँग्रेस एक लाख मुलींना देणार ‘सुरक्षा अॅप आणि मिरची स्प्रे’

नवी दिल्ली – बिहारमधील अनेक बालिका गृहामध्ये मुलींच्या अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या घटना पाहता काँग्रेस पक्ष पुढील काही महिन्यांतच राज्यात एक लाख मुलींना ‘विशेष सुरक्षा अॅप आणि मिरची स्प्रे’ देणार आहे.

पक्षाने ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी’ यांच्या जयंतीचे अौचित्य साधून २० आॅगस्ट पासून ‘इंदिरा शक्ति अॅप’ मुलींपर्यत पोहचविण्याची सुरूवात केली आहे. पक्षाचे म्हणणे आहे की, ‘महिलांना सुरक्षा अॅप सुविधा देणे आणि मिरची स्प्रे देणे याचा उद्देश राजकीय नाही आहे’. दरम्यान विरोधी पक्षांनी याला राजकीय पाऊल अाहे, असे म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काँग्रेसचे प्रभारी राष्ट्रीय सचिव राजेश लिलौठिया यांनी म्हटलं आहे की, ‘येत्या तीन-चार महिन्यांच्या आत पक्षाने महिला काँग्रेस आणि एनएसयूआय कार्यकर्ते यांना एक लाख महिलांच्या फोनमध्ये हे अॅप डाउनलोड करण्याचे आणि त्यांना मिरची स्प्रे देण्याचे टार्गेट ठेवले आहे’.

काँग्रेसने तयार केलेले हे अॅप डाऊनलोड करताना मुलींना त्यांच्या कुंटुंबियातील किंवा जवळचे नातेवाईक यापैकी चार जणांचे नबंर फीड करयाचे आहेत. संकटकाळी मुलीने या अॅपचे बटन क्लिक केल्यास संबंधित चार जणांना मुलींविषयी माहिती आणि सध्याचे ठिकाण याबाबतची माहिती पोहचेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)