बिहार बालमृत्यू प्रकरण : राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाची बिहार व केंद्र सरकारला नोटीस

पाटणा – बिहारमध्ये चमकी तापाच्या साथीने आतापर्यंत जवळपास १०० बालकांचा बळी घेतला असून अजूनही रुग्णालयांमध्ये चमकी तापाची लागण झालेल्या अनेक बालकांवर सध्या उपचार सुरु आहेत. अशातच आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाने बिहार सरकारला व केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला नोटीस बजावली असून या आजारामुळे मृत्यू झालेल्या बालकांबाबतचा सखोल अहवाल केंद्रीय मानव अधिकार आयोगाकडे चार आठवड्यांच्या कालावधीमध्ये सादर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत.

सदर नोटिसीद्वारे आयोगाने राज्य व केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला या प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी आखण्यात आलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या राज्यातील अंमलबजावणीबाबतही माहिती मागवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.