पाटणा – सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापासून बिहार पोलिस तत्कालीन डीजीपी गुप्तेश्वर पांडे चांगलेच चर्चेत होते. बिहार निवडणूक जवळ आल्यानंतर तर ते जास्तच चर्चेत आले. पांडेंनी पोलीस खात्यातील नोकरीचा राजीनामा दिला आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत
जेडीयूत प्रवेश करत थेट राजकारणात उडी घेतली.
जेडीयूत प्रवेश केल्यानंतर ते बक्सर जिल्ह्यातील कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र जेडीयूने जाहीर केलेल्या 115 उमेदवारांच्या यादीत गुप्तेश्वर पांडे यांचे नाव नाही. त्यामुळे नोकरीही गेली आणि उमेदवारीही गेली आता पांडे काय करणार अशी चर्चा
रंगली आहे.
पांडेना आता भाजपाचा आधार मिळण्याची आशा आहे. कारण बक्सर मतदारसंघातून भाजपाने अजून आपले उमेदवार घोषित केलेले नाही.