बिहार विधानसभा ‘बरखास्त’; मुख्यमंत्री नितीशकुमारांनी राज्यपालांकडे सोपवला राजीनामा

पाटणा – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानसभा भंग करण्याची शिफारस करण्यात आल्यानंतर नितीश कुमार यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपुर्द केला.

यावेळी विधानसभा बरखास्त करण्याची राज्यपालांना विनंती करण्यात आली आहे. आता, लवकरच नितिश कुमार पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

बिहारमध्ये राजकीय ‘भूकंप’ होणार; संजय राऊत यांचे भाकीत 

नितिश कुमार यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून तेच काम करणार आहेत. यापूर्वी आज झालेल्या एनडीएच्या बैठकीत दिवाळीनंतर आपला नवा नेता निवडण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बैठक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी पार पडली. यापुढची बैठक 15 नोव्हेंबरला होणार आहे, अशीही माहिती नितीश कुमार यांनी दिली.

बायडेन यांच्या भावी मंत्रिमंडळात ‘डझनभर’ भारतीय वंशीय; महत्वांच्या पदांसाठी झाली निवड 

बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल 11 नोव्हेंबरच्या पहाटे लागला. या निकालात एनडीएलाच बहुमत मिळाले आहे. मात्र भाजपाच्या जागा वाढल्या आहेत तर जदयूच्या जागा कमी झाल्या आहेत. असं असलं तरीही नितीश कुमार हेच मुख्यमंत्री होतील हे भाजपाने स्पष्ट केले आहे.

असे असलें तरीही जदयूच्या जागा कमी झाल्याने नितीश कुमार हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आता बिहारमध्ये सत्ता स्थापन होताना काही नाट्यमय घडामोडी घडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.