नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते उदयनराजे भोसले यांनी हो नाही करत अखेर भाजप प्रवेश केला आहे. शनिवारी आपल्या कार्यकर्त्यांसह उदयनराजेंनी भाजपामध्ये प्रवेश केला. अमित शाह, जे. पी.नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत त्यांनी कमळ हाती घेतले. त्यांनी यापूर्वी शुक्रवारी मध्यरात्री आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला होता.
Delhi: Udayanraje Bhosale, NCP Lok Sabha MP and descendant of Shivaji Maharaj joins Bharatiya Janata Party (BJP) in presence of BJP President Amit Shah and Maharashtra CM Devendra Fadnavis pic.twitter.com/XgG1p1YM3h
— ANI (@ANI) September 14, 2019
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज भाजपासोबत आले आहेत. भाजपाच्या कोट्यवधी कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करतो. त्यांनी आज तीन महिन्यातच खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. भाजपा पूर्वीपासून छत्रपतींच्या विचारातून प्रेरणा घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेपेक्षाही विधानसभेत आणखी मोठा विजय मिळेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. 2014 मध्ये महाराष्ट्राची जनता मनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडली गेली होती. 2019 मध्येही महाराष्ट्राच्या जनतेने याची प्रचिती दिली. विधानसभेतही मोठे यश मिळेल. उदयनराजेंच्या प्रवेशान सर्व खुष आहेत,असेही त्यांनी नमूद केले.