#BiggBoss14 : ‘माझ्याकडून अशी चूक होणार नाही’

मुंबई – आपल्या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या रिऍलिटी शो-मधील स्पर्धकाने मराठी भाषेबद्दल गरळ ओकल्याबाबत अखेर कलर्स वाहिनीने माफीनामा सादर केला आहे. तर जान कुमार नामक एका स्पर्धकाने  त्याच्या चुकीची जाणीव करून देत त्याला नॅशनल टेलिव्हिजनवर माफी मागावी लागली  आहे.  जानने मराठी लोकांची माफी मागून यापुढे अशी चूक करणार नाही अशी ग्वाही दिली.

जान म्हणाला की, ‘मी नकळत एक चूक केली त्यामुळे मराठी माणसांच्या भावनाला धक्का लागला, मराठी माणसांना दुखावण्याचा कोणताही हेतू नव्हता. मी यासाठी माफी मागतो. यापुढे माझ्याकडून अशी चूक होणार नाही.’

दरम्यान,  बिग-बॉस या रिऍलिटी शो-मधील जान कुमार नामक एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अवमान करताना, ‘मला मराठी भाषेची चीड येते’ असं संतापजनक वक्तव्य केलं होत.

जान कुमारच्या या वक्तव्यानंतर मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच मनसे व शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली होती. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याबाबत या वाहिनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपला माफीनामा सादर केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलर्स वाहिनीने मनसेला शुद्ध मराठीतील माफीनामा सादर केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.