बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार “संयमाची ऐशी तैशी”

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस 27 !

मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घराचे रूपांतर काल अद्भुत नगरामध्ये करण्यात आले आणि त्याचा राजा म्हणून बिग बॉस यांनी “संतोष चौधरी” म्हणजेच दादूस यांची निवड केली आणि त्यांच्यासोबत दिले तीन सल्लागार स्नेहा वाघ, गायत्री दातार आणि विशाल निकम. “स्वर्ग की नरक” या नॉमिनेशन टास्कसाठी.

यामध्ये स्वर्गात उत्कर्ष, तृप्तीताई, मीनल आणि मीरा तर बिग बॉस यांनी दिलेल्या दंडामुळे स्नेहा वाघ, विशाल निकम, गायत्री दातार थेट नॉमिनेट झाले तर नरकध्ये म्हणजेच या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी जय दुधाणे, आविष्कार दारव्हेकर, विकास पाटील, सोनाली पाटील हे देखील नॉमिनेट झाले.

आज घरामध्ये पार पडणार आहे संयमाची ऐशी तैशी हे साप्ताहिक कार्य. आता या टास्कमध्ये कोण संयम बाळगणार ? आणि कोणाचा संयम तुटणार बघायला मिळेल आजच्या भागामध्ये.

आज घर दोन टीममध्ये विभागले जाणार आहे टीम A आणि टीम B. बघूया काय होणार आजच्या भागामध्ये.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.