मुंबई – मुंबई – आता सुरू होणार खरा खेळ ! बिग बॉस घरातील सदस्यांना नवनवे टास्क देत असतात. आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींनाच्या हाती हार येते. बिग बॉस मराठी सिझन तिसराचा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे एक नवा टास्क दादुस ऑर्केस्ट्रा- फॅशन शोभेल तुला हा कार्यक्रम रंगणार आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमात विकास पाटील हा हृदयी वसंत फुलताना या गाण्यावर मीनल शाहसोबत नृत्य सादर करणार आहे. तर उत्कर्ष शिंदे हा सुरेखा कुडची यांच्यासोबत ही पोरगी साजूक तुपातली या गाण्यावर धमाल डान्स करणार आहे.
View this post on Instagram
या चौघांना दादुसची Dadus साथ मिळणार आहे. घरातला माहोल एकदम हलकाफुलका होणार असून सदस्यांनी बरीच धम्माल मस्ती केलेली या नव्या प्रोमोमधून दिसून येत आहे.
View this post on Instagram
या कार्यक्रमातील उत्कर्ष शिंदेची मुलीची भूमिका चांगलीच चर्चेत आली आहे. दरम्यान, घरातला दुसराच दिवस आहे. त्यात नवीन टास्क असल्याने सगळे स्पर्धक मेहनतीने आणि खिलाडू वृत्तीने खेळताना बघायला मिळणार आहे.