Bigg Boss Marathi : धमाका होणार; तृप्ती देसाईंची बिग बॉसच्या घरात ‘एन्ट्री’

मुंबई – बिग बॉसच्या तिसऱ्या सीजनसाठी प्रेक्षक आतुर आहेत. सायंकाळी 7 वाजल्यापासून कलर्स मराठीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमात हळू हळू एक एक स्पर्धक समोर येत आहेत. अभिनेत्री सोनाली पाटील आणि अभिनेता विशाल निकल हे बिग बॉस 3 मराठीच्या घरातील पहिले दोन सदस्य असणार आहेत.

आता बिग बॉसमध्ये स्नेहा वाघ, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष आनंद शिंदे, अविष्कार दारव्हेकर यांची एन्ट्री झाली आहे. बिग बॉसच्या घरात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेड संस्थेची संस्थापिका तृप्ती देसाई पाहायला मिळणार आहे.

तृप्ती देसाई यांच्या एन्ट्रीने बिग बॉसच्या घरात राडा पाहायला मिळणार आहे. देसाई यांनी शनी शिंगरणापूर मंदिराच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी मोठं आंदोलन छेडलं होतं. याची चर्चा राज्यभरात झाली होती.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.