Bigg Boss Marathi S3 : या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार ? कोण सेफ होणार ?

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस अठरावा आठवड्याची टीम “BB College”

मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल बिग बॉस सगळ्या सदस्यांना कॉलेजच्या सुवर्ण दिवसात घेऊन गेले. आणि जाहिर केले या आठवड्याची टीम असणार आहे “BB College”. या अंतर्गत काल पार पडली नॉमिनेशन प्रक्रिया.

“सफर करा मस्तीने” या नॉमिनेशन कार्यात काल पाच सदस्य सेफ झाले – आविष्कार, उत्कर्ष, मीरा, गायत्री आणि जय. आणि घरातील बाकी सर्व सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले आहेत. बघूया या आठवड्यात कोण घराबाहेर पडणार ? कोण सेफ होणार ?

BB College ही आठवड्याची टीम असून आविष्कार, स्नेहा, गायत्री, विशाल, विकास, जय, तृप्तीताई आणि मीनल हे विद्यार्थी बनले आहेत तर मीरा, उत्कर्ष, आदिश, सुरेखाताई, सोनाली आणि दादुस बनले आहेत शिक्षक.

धम्माल मस्ती तर येणारच आहे यात शंका नाही. आदिश वैद्य याने आज college मध्ये एक गुपित सांगितले आणि ते म्हणजे गायत्री दातारला कसे हसावायचे आणि ज्यात जयने देखील साथ दिली.

गायत्रीच्या हसण्याचा आवाज संपूर्ण बिग बॉस मराठीच्या घरात घुमला. या टास्कमुळे घरातील सगळे सदस्य एकत्र येऊन खेळणार असे दिसते आहे. यात काही ट्विस्ट तर नसेल ना ? जाणून घेण्यासाठी बघा आजचा भाग. तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.