Bigg Boss Marathi 6 : कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस मराठी’च्या घरात या आठवड्याचा ‘भाऊचा धक्का’ प्रेक्षकांसाठी अनेक अर्थाने निर्णायक ठरला. वाजत-गाजत आलेल्या बाप्पाच्या स्वारीनंतर रितेश देशमुख एका वेगळ्याच, ठाम आणि शिस्तप्रिय भूमिकेत दिसले. पहिल्या आठवड्यात घरातून कोणाची EXIT झाली नाही, त्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून कोणाची exit होणार हा प्रश्न सगळ्यांसमोर होता. बिग बॉस मराठीच्या घरातून EXIT घेणारी पहिली सदस्य ठरली राधा पाटील. आता येत्या आठवड्यात घरात कोणते टास्क रंगणार ? कोण घराचा कॅप्टन ठरणार ? कोण होणार नॉमिनेट ? कोण घरात टिकणार आंणि कोण बाहेर जाणार ? हे बघूया. पहा बिग बॉस मराठी सिझन ६ दररोज रात्री ८ वा. आपल्या कलर्स मराठीवर. भाऊच्या धक्क्यावर प्राजक्तावर दादागिरी करणाऱ्या अनुश्रीला रितेश भाऊंचा जबरदस्त शब्दिक दणका ऐकायला मिळाला. “भावाला आणलाय? सांगा आता काय सांगणार… हे बिग बॉसचं घर आहे, इथे मस्ती नाही तर शिस्त चालते” हा रितेश भाऊंचा एकच संवाद घरातील सगळ्यांची बोलती बंद करणारा ठरला. गेल्या आठवड्यात घरात तणावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं. आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमकी, नियमभंग आणि ढासळणारे नातेसंबंध यामुळे घर अधिकच तापलेलं दिसलं. काही सदस्यांमध्ये मैत्री घट्ट होताना दिसली, तर काहींच्या नात्यांमध्ये तुटवडा जाणवला. राकेश बापट याने साकारलेल्या बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन आणि प्राजक्ताच्या भजनाने मात्र संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं आणि या भावनिक क्षणांचं सर्वत्र कौतुक झालं. राधा पाटीलच्या एक्झिटनंतर घरातील समीकरणं कशी बदलणार, आणि पुढच्या भाऊच्या धक्क्यानंतर कोणाची शाळा तर कोणाला शाबासकी मिळणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे.