Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात नॉमिनेशन टास्क, कॅप्टनसी टास्क असे अनेक रंगतदार टास्क रंगत असतात. आज घरात एक भन्नाट कॅप्टनसी टास्क पार पडणार आहे. नव्या आठवड्यातील नव्या टास्कदरम्यान घरातील सदस्य चांगलाच कल्ला करताना दिसणार आहे. बोटीत बसून घराचा कॅप्टन कोण बनणार हे ठरणार आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये, सदस्य बोटीत बसून बोटी शोधाताना दिसत आहेत. बोटी शोधण्यासह त्यांना कॅप्टनपदाचे उमेदवार बाजूला करायचे आहेत. प्रोमोमध्ये या टास्कदरम्यान अभिजीतला दुखापत झालेली दिसून येत आहे. कॅप्टनसी टास्कमध्ये कोणता सदस्य बाजी मारणार हे काही तासांतच कळेल.
निक्कीसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील कच्चा लिंबू कोण असेल?
‘बिग बॉस मराठी’च्या आजच्या भागात निक्की आणि जान्हवी त्यांना वाटत असलेल्या घरातील कच्चा लिंबूबद्दल भाष्य करताना दिसत आहेत. निक्कीसाठी ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील कच्चा लिंबू रॅपर आर्या जाधव आहे. निक्कीने आर्याचं नाव घेत बिग बॉसलादेखील याबद्दल सांगितलं आहे.
Bigg Boss Marathi 5: शेवटी आलो, शेवटी जाणार..! सूरज म्हणतोय,”ट्रॉफी मीच जिंकणार”