Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि गोलीगत सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला. गोलीगत सूरजला ‘बिग बॉस मराठी’चा खेळ कळलाच नाही, असे म्हटले जाऊ लागले.
पण त्याने स्वत:वर मेहनत घेतली आणि आपला खेळ दाखवायला सुरुवात केली. वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनेदेखील सूरजच्या खेळीचं कौतुक केलं. तसेच त्याला यापुढेही गोलीगत पॅटर्नने खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं.
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या प्रोमोमध्ये गोलीगत सूरज चव्हाण गार्डन एरियामध्ये केर काढताना दिसत आहे. त्यावर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू वालावलकर आणि हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळे चर्चा करताना दिसत आहेत.
अंकिता म्हणतेय,”सूरजला असं बघून मला कसंतरी वाटतं”. त्यावर पॅडी म्हणतो,”बिचारा बाहेरदेखील हेच काम करत असेल. तो काल मला म्हणालेला, दादा मला खूप वाईट वाटतं मी वर झोपतो आणि तुम्ही खाली झोपता”. त्यावर अंकिता म्हणते,”सूरजला गेम कळला नाही, पण माणसं कळली”.
टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गोलीगत सूरज चव्हाणचं नेटकऱ्यांकडून चांगलच कौतुक होत आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घरदेखील गाजवत आहे.