Bigg Boss Marathi 5 । pink jacket | Dhananjay Powar | Ajit Pawar: ‘बिग बॉस मराठी’चा लयभारी खेळ दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. आज भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख घरातील सर्व सदस्यांची चांगलीच शाळा घेताना दिसून येणार आहे. दरम्यान रॅपर आर्याची देखील कानउघडणी करताना रितेश भाऊ दिसेल. “मला सांगू नका तुम्ही कसे दिसताय”, असं म्हणत रितेश भाऊ आर्याची जोरदार शाळा घेताना दिसणार आहे.
प्रोमोमध्ये रितेश आर्याला म्हणतोय,”तुमचा गेम निक्कीशिवाय दिसत नाही”. यावर उत्तर देत आर्या म्हणते,”निक्की प्रॉब्लेम क्रिएट करते. आम्ही त्याच्यावर रिअॅक्शन देतो”. दरम्यान आर्याला थांबवत रितेश म्हणतो,”आम्ही नाही… तुम्ही स्वत:बद्दल बोला”.
त्यावर आर्या म्हणते,”निक्की माझा गेम नाही आहे”. यावर रितेश भाऊ म्हणतो,”तुम्हाला असं वाटतं तुमचा गेम नाही आहे… आता तुम्ही जे दिसताय ते फक्त निक्कीच्या रिअॅक्शनवर दिसताय. मला इथे सांगू नका तुम्ही कसे दिसताय”.
टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय !
‘भाऊचा धक्का’ एपिसोडमध्ये रितेश धनंजयला म्हणतो, “धनंजय तुमचं जॅकेट फार छान आहे. टेलर बहुतेक बारामतीचा दिसतोय. कारण ही तिकडची स्टाइल आहे. कोल्हापूरपर्यंत आली आहे, असं कळतंय. छान दिसतंय” हे ऐकताच धनंजयसह घरातील इतर स्पर्धक हसू लागतात.
‘बारामतीचा टेलर’ या रितेशच्या कमेंटचं कनेक्शन अजित पवारांशी जोडलं जातंय. ‘लाडकी बहीण योजने’ची घोषणा केल्यापासून अजित पवार सतत गुलाबी जॅकेटमध्येच दिसून येत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रियासुद्धा दिली होती.
गुलाबी जॅकेटवर अजित पवार पहिल्यांदयाच बोलले…
नेमकं या गुलाबी रंगा मागचं रहस्य काय? हे आता स्वतः अजित पवार यांनी उघडं केलं आहे. (दि. 20 जुलै) माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना गुलाबी रंगाचं जॅकेट का परिधान केलं? असा सवाल विचारण्यात आला असता, ते म्हणाले की, ‘तुला काही त्रास होतोय.. मला व्यक्ती स्वातंत्र आहे.
मला काय घालायचं त्याचा मला अधिकार नाही का? मी माझ्या पैशानी घालतो.. तुमच्या पैशांनी घालतो का? जे कॉमन मॅन घालतो तेच मी घालतो.. मी माझ्या पैशाने पिंक जॅकेट घातलं. मी काय घालायचं हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे.
माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे योग्य वाटतं तेच मी करतो, असं अजित पवार म्हणाले. एवढंच नाही तर त्यासाठी अजित पवारांनी 12 गुलाबी रंगाची जॅकेट शिवून घेतल्याचेही समजते.