मुंबई – बिग बॉस हिंदीचा यंदाचा सीजन सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्यासोबतच चर्चेत आहे त्यात येणारे चेहरे. सनी नानासाहेब वाघचौरे अर्थात पुण्याचा गोल्ड मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या या तरुणाने देखील नुकतीच बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री केली होती. यावेळी सनीला पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं आणि एक प्रश्नही पडला. तब्बल पाच ते आठ किलोचं सोनं रोज तो अंगावर कस घालू शकतो ? एका मुलाखती दरम्यान स्वतः सनीने या प्रश्नाचं उत्तर दिलय.
बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी देखील सनी वाघचौरे हे नाव सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध होत. सनीला पहिल्यापासूनच सोन्याची प्रचंड आवड आहे. गळ्यात सोन्याच्या चैन,हातात ब्रेसलेट,कडे आणि सोन्याचे घड्याळ असा ऐवज सनी परिधान करून नेहमीच फिरताना दिसतो. यामुळेच सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसतात. एका हिंदी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत स्वतः सनीने या सोन्याबाबत भाष्य केलं आहे.
सनी म्हणतो,मला अनेकजण विचारतात की तुम्ही एव्हडं सोन कस घालू शकता ? मी त्यांना सांगू शकतो की,जर तुम्ही एखाद काम अनेक दिवसांपासून करत असाल तर त्याची तुम्हाला सवय होऊन जाते. उदा,एखादी व्यक्ती जिममध्ये व्यायाम करत असेल आणि १०० किलो वजन उचलत असेल तर त्याला पाहून अनेकांना आश्चर्य वाटत परंतु त्या व्यक्तीला त्याचे काहीच वाटत नाही कारण रोज तो हेच काम करत असतो. सांगण्याचं तात्पर्य हे कि,मी लहानपणापासून सोन परिधान करतोय आता सात ते आठ किलो सोन रोज घालत असलयाचे देखील सनीने यावेळी स्पष्ट केले. या सोन्याची किंमत तब्बल साडे चार ते पाच कोटींच्या घरात जाते.