मुंबई – आपल्या वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या रिऍलिटी शो-मधील स्पर्धकाने मराठी भाषेबद्दल गरळ ओकल्याबाबत अखेर कलर्स वाहिनीने माफीनामा सादर केला आहे. बिग-बॉस या रिऍलिटी शो-मधील जान कुमार नामक एका स्पर्धकाने मराठी भाषेचा अवमान करताना, ‘मला मराठी भाषेची चीड येते’ असं संतापजनक वक्तव्य केलं होत.
जान कुमारच्या या वक्तव्यानंतर मराठी भाषिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तसेच मनसे व शिवसेनेने देखील आक्रमक भूमिका घेतली होती. मराठी भाषिकांच्या भावना दुखावल्याबाबत या वाहिनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे आपला माफीनामा सादर केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलर्स वाहिनीने मनसेला शुद्ध मराठीतील माफीनामा सादर केला आहे.
बिग बॉस शोमध्ये जान सानू या स्पर्धकाने मराठी भाषेचा अवमान केल्याप्रकरणी आज राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्रमक भूमिका घेत २४ तासांच्या आत माफी माग. असा इशारा दिला होता.