मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरमध्ये आज जाणार आहेत तीन सदस्य तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे या तिघांनी सांगितले.
स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती देसाईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.
तृप्ती म्हणाल्या, “विशाल एकदम मस्त… मागच्या आठवड्यात जो ट्रक चेंज केला ना, वन मॅन आर्मी. जे मी पहिल्यापासून सांगत होते कुठेतरी चेंज झाला पाहिजे आणि तुम्हांला सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही ! लंबी रेस का घोडा है !मस्त एकदम.
आणि मी सगळ्यांना सांगितलं की, सगळ्यात छान मनं आमच्या विशालचं आहे, की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं कधी नसतं…” तृप्ती मीराला म्हणाल्या तू फटक्यांमध्ये लक्ष्मी बॉम्ब आहेस, तर मीनल म्हणाल्या तुम्ही सुतळी बॉम्ब खेळामध्ये. पुढे म्हणाल्या, मुलींमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्लेयर आहात…”