Bigg Boss 18 Grand Finale : टीव्हीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसचा सध्या 18वा सीझन सुरू आहे. या सीझनला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिएलिटी शो चा हा सीझन लवकरच संपणार असून, याच्या ग्रँड फिनालेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी चाहत्यांची मने देखील जिंकली. लवकरच या शोचा ग्रँड फिनाले पार पडणार असून, बिग बॉस 18 चा विजेता सर्वांसमोर येईल. यंदाचा सीझन चांगलाच चर्चेत राहिला आहे. सोशल मीडियावर देखील स्पर्धकांना मोठा पाठिंबा मिळाला आहे.
कधी होणार बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले?
बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. कलर्स टीव्हीवर रात्री 9 वाजता कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पाहता येईल. याशिवाय, जिओ सिनेमाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला लाईव्ह विजेतेपदाची ट्रॉफी उचलताना होताना पाहता येणार आहे.
विजेत्याला बक्षीस म्हणून मिळणार तब्बल ‘इतके’ रुपये :
फिनालेमध्ये नक्की कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला 50 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. तसेच स्पॉन्सर्सकडून इतरही काही भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे.
निर्मात्यांनी ठराविक पैसे घेऊन शो सोडण्याचा पर्याय फिनालेमध्ये ठेवल्यास ती रक्कम विजेत्याच्या रकमेतून वजा होऊ शकते. याच बरोबर बिग बॉसची ट्रॉफी देखील समोर आली असून, सोशल मीडियावर ट्रॉफीचा फोटो शेअर करण्यात आला आहे.
कोण आहेत टॉप सहा सदस्य? पाहा…
बिग बॉस 18 ला टॉप 6 सदस्य मिळाले आहेत. यामध्ये ‘करणवीर मेहरा, चुम दरांग, रजत दलाल, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा व इशा सिंह’ हे बिग बॉस 18 चे फायनलिस्ट आहेत.