Bigg Boss 18 | Gunaratna Sadavarte : ‘सूरज चव्हाण’ने मराठी बिग बॉस सीजन 5 च्या ट्रॉफीवर जेतेपदाचं नाव कोरलं. मराठी बिग बॉसचा समारोप सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. परंतु, आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी हिंदी बिग बॉसचा 18 वा सीजन सुरु झाला आहे.
या बिग बॉसच्या सीजनमध्ये वकील गुणरत्न सदावर्तेंची धडाकेबाज एन्ट्रीने तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. जेव्हा गुणरत्न सदावर्ते यांची स्पर्धक म्हणून घरात एन्ट्री झाली तेव्हा त्यांनी आपल्या सोबत घरात गाढव सुद्धा आणले आहे. त्याचे नाव गधराज आहे.
मात्र, आता या गाढवामुळे अभिनेता सलमान खान अडचणीत येण्याची शक्यता आहे. पेटाया संघटनेने थेट सलामान खानला पत्र लिहिले आहे. या शोमध्ये मनोरंजनासाठी कोणत्याही प्राण्याचा वापर करु नये, असं त्यांनी म्हंटलं आहे.
बिग बॉसच्या शोमधून सुटका झालेल्या गाढवाला आम्ही अभयारण्यात पाठवू. यामुळे वकील गुणरत्न सदावर्ते यांचे चाहतेही खूश होतील. असं देखील त्यांनी सांगितलं आहे. ‘बिग बॉस हा मनोरंजनाचा कार्यक्रम आहे. परंतु त्यात प्राण्यांचा वापर करुन मनोरंजन करणे चुकीचे आहे.
गाढवसाठी शोच्या सेटवर लावण्यात आलेले लाईट, त्या ठिकाणी होणारा आवाज हे सर्व भीतीदायक आहेत. कोणत्याही टीव्ही शोमध्ये प्राण्यांचा वापर करु नये. गाढव हा एक सामाजिक प्राणी आहे. यापूर्वी कुत्रा, पोपट, एक मासा स्पर्धेक म्हणून आणल्याचे पेटाने पत्रात म्हटले आहे.
बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच मिळाली जीवे मारण्याची धमकी :
बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वीच वकील सदावर्ते यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. इंटरनॅशनल काॅलवरुन त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळालीये. निनावी क्रमांकावरून हा काॅल आल्याची माहिती आहे.
वरळी विधानसभेतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याने तसेच जिजामाता नगर संदर्भात वक्तव्यामुळे जीवे मारण्याची दिली धमकी मिळाली असा आरोप करण्यात आला आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री सदावर्ते भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याठी रवाना झाल्या आहेत. महाराष्ट्रात गुणरत्न सदावर्ते नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतात.
‘बिग बॉस 18’मधील सदस्य कोण आहेत?
गुणरत्न सदावर्तेंसह चाहत पांडे, शेहजादा धामी, अविनाश मिश्रा, शिल्पा शिरोडकर, तेंजिदर पाल सिंह, श्रुतिका अर्जुन, नायरा बनर्जी, चुम दरंग, करण मेहरा, रजत दलाल, मुस्कार बामने, अरफीन खान, सारा अरफीन खान, ईशा सिंह, हेमा शर्मा, विवियन डिसेना, एलिस कौशिक हे यंदाचे स्पर्धक आहेत.