Bigg Boss 18 Finale: टीव्हीवरील लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉसचा सध्या 18वा सीझन सुरू आहे. या सीझनला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिएलिटी शो चा हा सीझन लवकरच संपणार असून, याच्या ग्रँड फिनालेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे.
या सीझनमध्ये अनेक लोकप्रिय चेहरे सहभागी झाले होते. या स्पर्धकांनी चाहत्यांची मने देखील जिंकली. आता फिनालेमध्ये ईशा सिंग, विवियन डिसेना, चुम दारांग या स्पर्धकांमध्ये ट्रॉफी व बक्षिसाच्या रक्कमेसाठी स्पर्धा पाहायला मिळेल.
कधी होणार बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले?
बिग बॉस 18 चा ग्रँड फिनाले 19 जानेवारी 2025 रोजी होणार आहे. कलर्स टीव्हीवर रात्री 9 वाजता कार्यक्रमाचा ग्रँड फिनाले पाहता येईल. याशिवाय, जिओ सिनेमाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकाला विजेतेपदाची ट्रॉफी उचलताना होताना पाहता येणार आहे.
विजेत्याला किती बक्षिसाची रक्कम मिळणार?
फिनालेमध्ये नक्की कोणता स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी जिंकणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. ही स्पर्धा जिंकणाऱ्या स्पर्धकाला 50 लाख रुपये बक्षीस मिळणार आहे. जसजसा फिनाले जवळ येत चालला आहे, तसे स्पर्धक व प्रेक्षकांची उत्सुकताही वाढत चालली आहे.
बिग बॉसच्या ट्रॉफीसाठी कोणत्या स्पर्धकांमध्ये शर्यत?
बिग बॉस 18 च्या फिनालेमध्ये पोहोचण्यासाठी सर्वच स्पर्धकांनी जीवाची बाजी लावली. अनेक टास्क पूर्ण करत हे स्पर्धक फिनालेपर्यंत पोहोचले आहेत. फिनालेमध्ये करण वीर मेहरा, विवियन डिसेना, अविनाश मिश्रा, चुम दारंग आणि ईशा सिंग हे स्पर्धक पाहायला मिळतील. यापैकी कोणता स्पर्धक विजेता होणार हे पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत.