‘बिग बॉस-13’ होणार बंद? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार

नवी दिल्ली: अश्‍लीलता पसरविणे आणि देशाच्या सामाजिक नैतिकतेला इजा पोहचत असल्यामुळे ‘बिग बॉस -13’ चे प्रसारण त्वरित थांबवायला हवे, अशी मागणी यूपीमधील लोणी (गाझियाबाद) येथील भाजपचे आमदार नंद किशोर गुर्जर यांनी केली.

माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून त्यांनी ही मागणी केली आहे. दरम्यान, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कलर्स वाहिनीवर प्रसारित होणारा ‘बिग बॉस-13’ या रिअ‍ॅलिटी शोविरोधातील तक्रारीकडे लक्ष दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.