#bigbreaking : राजधानी दिल्लीत विकेण्ड कर्फ्यू

मुंबई – देशात करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सध्या दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण वाढत असून आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांवर प्रचंड ताण आला आहे. त्याचवेळी आरोग्य सुविधेअभावी मृत्यूदर वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातच दिल्लीतील  करोना रुग्णसंख्या  ब्रेक  करण्यासाठी  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीत विकेण्ड कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

त्यांनी सांगितले आहे की, या विकेंड कर्फ्यूमध्ये सभागृह, मॉल, जीम आणि स्पा बंद असणार आहेत. तर चित्रपटगृहांना ३० टक्के प्रेक्षक क्षमतेसह सुरु ठेवण्याची परवानगी आहे. तसंच फक्त होम डिलिव्हरीची परवानगी आहे. आठवडी बाजारांना परवानगी आहे, मात्र त्यांना निर्बंधाचं पालन करावं लागेल. कर्फ्यूमध्ये लग्नासाठी जाणाऱ्यांना ई-पास दिला जाईल अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

दरम्यान,देशात करोनाचा कहर अद्यापही सुरु असून दैनंदिन रुग्णसंख्येने दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल २ लाखांहून अधिक करोना रुग्ण आढळले आहेत. तसंच सलग दुसऱ्या दिवशी एक हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात ९३ हजार ५२८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.