Big Breaking : अणुबॉम्बसाठी वापरले जाणारे सात किलो युरेनियम महाराष्ट्र ATS कडून जप्त

महाराष्ट्र दहशतवादीविरोधी पथकाने केली कारवाई

मुंबई – महाराष्ट्रातील दहशतवादीविरोधी पथकाने आजवरची सर्वात मोठी कारवाई केली आहे. मिळलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एटीएसने मुंबईतील नागपाडा येथून दोन जणांना अटक केली. या दोघांकडे ७ किलो १०० ग्रॅम युरेनियम आढळून आलं आहे. या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख रुपये इतकी आहे. अणु ऊर्जा कायदा, १९६२ अंतर्गत या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान, युरेनियम खरेदी करणाऱ्यासाठी कोणी तयार होत आहे का याचा शोध दोन्ही आरोपी घेत असतानाच एटीएसने त्यांच्यावर छापा टाकून हे युरेनियम जप्त केला आहे. या युरेनियमची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २१ कोटी रुपये इतकी आहे. हे युरेनियम भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरकडे चाचणीसाठी पाठविले होते, यामध्ये हे युरेनियम उच्च दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. आरोपींचे नाव जिगर पांड्या (रा. ठाणे), अबु ताहीर (रा. मानखुर्द) असून या दोघांना अटक करण्यात आली आहे.

एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वृत्त माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, जिगर हा युरेनियम विक्रीसाठी नागपाड्याला येणार असल्याची टीप एटीएसला मिळाली होती. यानुसार एटीएसने सापळा रचला व जिगरला पकडले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने अबु ताहीरने हे युरेनियम दिल्याचे सांगितले. एटीएसकडून या दोघांकडे एवढ्या मोठ्याप्रमाणामध्ये युरेनियम कुठून आणि कसा आला याचा सध्या शोध घेतला जात आहे. दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १२ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.